गोपनीयता धोरण

हे गोपनीयता धोरण (“गोपनीयता धोरण”) मायॲग्रीगुरूने (“मायॲग्रीगुरू” “आम्ही” किंवा “आमचे/आमच्या”) तुमच्याकडून किंवा तुमच्याविषयी गोळा केलेल्या माहितीचे वर्णन करते. यात आम्ही गोळा केलेल्या माहितीस आम्ही कशा रीतीने वापरू शकतो, व्यक्त करू शकतो आणि हाताळू शकतो याचे देखील वर्णन आहे.

तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण एक अतिशय महत्त्वाचे तत्त्व असे आम्ही मानतो. आम्ही स्पष्टपणे मानतो की तुम्ही आणि तुमची वैयक्तिक माहिती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची संपत्ती आहे. आम्ही तुमच्या तुमच्या संवेदनशील माहितीस संगणकांवर, उपकरणांवर साठवतो आणि त्यावर प्रक्रिया करतो, ज्यात, जर असल्यास, गोळा केलेली संवेदनशील आर्थिक माहिती (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या अंतर्गत उल्लेख केल्यानुसार) असते, जी प्रत्यक्ष रूपाने तसेच रास्त अशा तंत्रज्ञानात्मक सुरक्षा उपाययोजना आणि कार्यप्रणालीद्वारा माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्यांतर्गत नियमांच्या अनुषंगाने सुरक्षित असते.

आमचे ॲप/वेबसाईट वापरण्याअगोदर, तुम्ही आमच्या ॲप/वेबसाईटवर या गोपनीयता धोरण आणि अटी आणि शर्तींचा आढावा घेतला पाहिजे. हे ॲप/वेबसाईट वापरल्याने तुम्ही या गोपनीयता धोरणात निर्धारित तुमच्या वैयक्तिक माहितीस माहितीस गोळा करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी, वापरासाठी आणि उघड करण्यासाठी संमती देत आहात. या धोरणाद्वारे तुम्हाला बांधील राहावयाचे नसेल, तर तुम्हाला आमच्या ॲप/वेबसाईटला वापरण्याचा अधिकार नसेल आणि तुम्ही त्याला पाहू किंवा वापरू शकणार नाही.

आमच्या माहिती गोळा करण्याच्या आणि त्याच्या प्रसाराच्या सरावाविषयी जाणून घेण्यासाठी कृपया खालील विधाने वाचा.

नोंद:
आमचे गोपनीयता धोरण कोणत्याही सूचनेविना कोणत्याही वेळी बदलण्याच्या अधीन आहे. कोणत्याही बदलासाठी तुम्ही जागरूक असण्याची खात्री करण्यासाठी, कृपया या अधूनमधून या धोरणाचा आढावा घेत रहा.

या ॲप/वेबसाईटला भेट दिल्याने, तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या अटी आणि शर्तींद्वारा बांधील राहण्याचे कबूल करता. तुम्ही यासाठी कबूल नसल्यास कृपया आमचे ॲप/वेबसाईट वापरू किंवा पाहू नका.

या ॲप/वेबसाईटच्या केवळ वापराने, या गोपनीयता धोरणाच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या आमच्या वापराला आणि उघड करण्याला सव्यक्त संमती देत आहात.


 1. व्यक्तिगत ओळख दर्शविणाऱ्या आणि इतर माहितीस गोळा करणे

  जेव्हा तुम्ही आमचे ॲप/वेबसाईट वापरता, तेव्हा आम्ही तुम्ही वेळोवेळी पुरविलेली तुमची वैयक्तिक माहिती गोळा करतो आणि साठवून ठेवतो. असे करण्यात आमचे मुख्य ध्येय तुम्हाला एक सुरक्षित, कार्यक्षम, सुरळीत आणि व्यक्तिगत बनविलेला अनुभव पुरविणे असतो. यामुळे आम्ही तुमच्या गरजा भागवू शकतील अशा सेवा आणि वैशिष्ट्ये पुरवू आणि तुमचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोपा बनविण्यासाठी आमचे ॲप/वेबसाईट व्यक्तिगत स्वरूपाचे बनवू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या हेतूस साध्य करण्यासाठी आम्हाला आवश्यक वाटेल अशा तुमच्या वैयक्तिक माहितीस गोळा करतो.

  जेव्हा तुम्ही आमचे ॲप वापरता, तेव्हा आमच्या ॲपला डाऊनलोड करण्यासाठी पहिल्या पायरीत तुमच्या उपकरणात स्टोअर केलेल्या डेटाला पाहण्याची परवानगी मागेल, ज्यात छायाचित्रे, मोबाईल युजर अकाऊंट आणि संपर्क असे तपशील असतील, आणि तुम्हाला त्याच्या अनुषंगाने “होय” किंवा “नाही” उत्तर द्यावे लागेल. नंतर, तुम्ही पुढे जाऊन या ॲपवरील माहिती डाऊनलोड करू शकता आणि पाहू शकता.

  सामान्यपणे, तुम्ही कोण आहात हे आम्हाला न सांगता किंवा तुमच्याविषयी कोणत्याही व्यक्तिगत माहितीस उघड न करता तुम्ही ही वेबसाईट ब्राउज करू शकता. एकदा तुम्ही या वेबसाईटवर तुमची व्यक्तिगत माहिती दिली किंवा जेव्हा तुम्ही हे ॲप ब्राउज करता, तेव्हा तुम्ही आम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देता आणि त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी निनावी रहात नाही. जेथे शक्य असेल, तेथे कोणती क्षेत्रे आवश्यक आहेत आणि कोणती क्षेत्रे पर्यायी आहेत हे आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही आमच्या ॲप/वेबसाईटवरील तुमच्या वागणुकीनुसार तुमच्याविषयी ठराविक माहितीचा आपोआप माग घेऊ शकतो. आम्ही या माहितीचा उपयोग आम्ही आमच्या वापरकर्त्यांना चांगल्या रीतीने जाणून घेण्यास, त्यांचे संरक्षण करण्यास आणि सेवा देण्यास आमच्या वापरकर्त्यांच्या जनसांख्यिकी, हित आणि प्रवृत्तीबद्दल अंतर्गत संशोधन करण्यासाठी वापरतो. ही माहिती एकत्रित केली जाते आणि समुच्चय आधारावर त्याचे विश्लेषण केले जाते. या माहितीत तुम्ही नुकतेच जिथून आला ते URL (मग ते URL आमच्या वेबसाईटवरील असेल किंवा नसेल), तुम्ही पुढे कोणत्या URL गेला (मग ते URL आमच्या वेबसाईटवरील असेल किंवा नसेल), तुमच्या संगणकाची ब्राउजर माहिती आणि तुमचा IP अड्रेस यांचा समावेश असू शकतो.

  आम्ही आमच्या वेब पेज फ्लोच्या विश्लेषणात मदत करण्यासाठी, प्रचारात्मक परिणामकारकता मोजण्यासाठी, आणि विश्वास आणि सुरक्षितता यांना पाठींबा देण्यासाठी ॲप/वेबसाईटच्या ठराविक पेजीसवर “कुकीज”सारखी डेटा संग्रहण उपकरणे वापरतो. “कुकीज” हे तुमच्या हार्ड ड्राईव्हवर असलेले लहान फाईल्स असतात, जे आमच्या सेवा पुरविण्यात मदत करतात. आम्ही काही ठराविक फीचर्स प्रस्तुत करू शकतो, जे केवळ एखाद्या “कुकीज” वापराद्वारेच उपलब्ध असतील.

  आम्ही एखाद्या सत्रादरम्यान तुमचा पासवर्ड कमी वेळा दाखल करावा लागावा म्हणून देखील कुकीजचा वापर करतो. तुमचे हित लक्ष्य असलेल्या माहितीस पुरविण्यात देखील कुकीज आम्हाला मदत करतात. महुतेक कुकीज “सत्र कुकीज” असतात, ज्याचा अर्थ सत्राच्या अखेरीस ते तुमच्या हार्ड ड्राईव्हमधून आपोआप हटविले जातात. तुमच्या ब्राउजरने अनुमती दिल्यास तुम्ही तुमच्या कुकीजच्या वापरास नकार देऊ शकता, तथापि अशा वेळी तुम्ही या ॲप/वेबसाईटवरील काही फीचर्सचा वापर करू शकणार नाही आणि तुम्हाला एखाद्या सत्रा दरम्यान अनेक वेळा पासवर्ड पुनः दाखल करावा लागू शकतो. सोबत, “कुकीज”चा किंवा तुम्हाला त्रयस्थ पक्षांद्वारा ठेवल्या गेलेल्या या ॲप/वेबसाईटच्या ठराविक पेजीसवरील इतर समान उपकरणांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला या ॲप/वेबसाईटवर खरेदी करावयाचे असेल, तर आम्ही तुमच्या खरेदी करण्याच्या सवयींविषयी माहिती गोळा करतो. तुमी आमच्यासोबत व्यवहार केला, तर आम्ही बिलिंगचा पत्ता, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, आणि क्रेडिट/डेबिट कार्ड मुदतसमाप्ती तारीख आणि/किंवा इतर भरणा संलेखाचे तपशील आणि धनादेश किंवा मनी ऑर्डर्समधून मार्ग निरीक्षण माहिती सारखी अतिरिक्त माहिती गोळा करतो.

  तुम्ही आमच्या संदेश फलक, चाट रूम्स किंवा इतर संदेश क्षेत्रांवर संदेश पोस्ट करू इच्छित असाल किंवा प्रतिसाद सोडायचा असेल, तर तुम्ही दिलेली माहिती आम्ही गोळा करतो. तंटे सोडविण्यासाठी, ग्राहकास समर्थन देण्यासाठी आणि कायद्याद्वारा अनुमती दिल्यानुसार समस्या निवारणासाठी जरुरी म्हणून आम्ही ही माहिती राखून ठेवतो.

  तुम्ही आम्हाला इमेल्स किंवा पत्रांसारखा व्यक्तिगत पत्रव्यवहार पाठविला, किंवा ॲप/वेबसाईटवरील तुमच्या क्रिया किंवा पोस्टिंग्जविषयी इतर वापरकर्त्यांनी किंवा त्रयस्थ पक्षांनी आम्हाला पत्रव्यवहार पाठविला, तर आम्ही अशा माहितीस तुमच्यासाठी विशिष्ट अशा फाईलमध्ये गोळा करून ठेवू शकतो.

  जेव्हा तुम्ही आमच्या सोबत एक मोफत खाते उघडता, तेव्हा आम्ही व्यक्तिगत स्वरूपातील ओळख उघड होऊ शकेल अशी माहिती तुमच्याकडून गोळा करतो. आम्ही ॲप/वेबसाईट / ऑर्डर्स आणि तुमच्या स्वारस्यांच्या अनुसार तुम्हाला पत्रव्यवहार/सूचना/ऑफर्स पाठविण्यासाठी तुमच्या संपर्क माहितीचा वापर करतो.

 2. जनसांख्यिकी / प्रोफाईल डेटा / तुमच्या माहितीचा वापर

  तुम्ही विनंती केलेल्या सेवा पुरविण्यासाठी आम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर करतो. तुमच्या व्यक्तिगत माहितीस ज्या प्रमाणात आम्ही तुमच्यासाठी विपणनासाठी वापरतो, त्या प्रमाणात अशा वापराच्या परिणामासाठी आम्ही तुम्हाला क्षमता प्रदान करतो. आम्ही तुमची माहिती तंटे सोडविण्यासाठी; समस्या निवारणासाठी; एखाद्या सुरक्षित सेवेच्या समर्थनाच्या मदतीसाठी; पैसे गोळा करण्यासाठी; आमच्या सेवेतील ग्राहकांच्या रुचिस जाणून घेण्यासाठी; तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑफर्स, उत्पादने, सेवा, आणि ॲपडेट्सविषयी कळविण्यासाठी; तुमच्या अनुभवला व्यक्तिगत बनविण्यासाठी; त्रुटी, फसवणूक आणि इतर गुन्हेगारी क्रिया शोधण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध आमचे संरक्षण करण्यासाठी; आमच्या अटी आणि शर्ती लागू करण्यासाठी; आणि संग्रहणाच्या वेळी तुम्हाला वर्णन केल्यानुसार आम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर करतो.

  आमच्या सेवांचे प्रस्ताव निरंतर सुधारण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये, आम्ही आमच्या ॲप/वेबसाईटवर आमच्या वापरकर्त्यांच्या क्रियांविषयी जनसांख्यिकी आणि प्रोफाईल डेटा गोळा करतो आणि त्यांचे विश्लेषण करतो.

  आमच्या सर्वर्ससह असलेल्या समस्यांचे निदान करण्यासाठी, आणि आमच्या ॲप/वेबसाईटची व्यवस्था पाहण्यासाठी आम्ही तुमच्या आयपी अड्रेसला ओळखतो आणि वापरतो. तुमचा आयपी अड्रेस तुम्हाला ओळखण्यात मदत करण्यासाठी आणि व्यापक अशी जनसांख्यिकीय माहिती गोळा करण्यासाठी देखील वापरला जातो.

  आम्ही तुम्हाला अधूनमधून पर्यायी ऑनलाइन सर्वेक्षण भरण्यास सांगू. ही सर्वेक्षणे तुमच्याकडे संपर्क माहिती आणि जनसांख्यिकी माहिती (जसे, झिप कोड, वय, किंवा उत्पन्नाची पातळी) विचारू शकतात. आम्ही हा डेटा तुम्हाला स्वारस्य असेल असे आम्हाला वाटणारा आशय पुरवित, आमच्या ॲप/वेबसाईटवरील तुमच्या अनुभवाला अनुकूल बनविण्यासाठी आणि तुमच्या पसंतीनुसार आशय प्रदर्शित करण्यासाठी वापरतो.

कुकीज

“कुकी” माहितीचा एक लहान तुकडा असतो, जो वेब ब्राउजरवर वेब सर्वरद्वारा स्टोअर केलेला असतो,जेणेकरून त्या ब्राउजरद्वारा त्याला नंतर परत वाचले जाऊ शकेल. कुकीज वापरकर्त्यासाठी नेमक्या माहितीस आठवणीत ठेवण्यास ब्राउजरला सक्षम बनविण्यास उपयुक्त असतात. आम्ही तुमच्या संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर कायमस्वरूपी आणि तात्पुरते असे दोन्ही कुकीज ठेवतो. त्या कुकीजमध्ये तुमच्या वैयक्तिकरीत्या उघड होऊ शकणारी अशी कोणतीही माहिती नसते.

 1. व्यक्तिगत माहिती व्यक्त करणे

  आम्ही कोणत्याही त्रयस्थ पक्षाला व्यक्तिगत माहिती कळवू शकतो, ज्यात आमच्या संलग्न कंपन्या, समूह कंपन्या, एजंट्स, ठेकेदार, सेवा पुरवठादरा यांच्यासह इतर अनेक सामील असू शकतात, ज्याचा उद्देश ओळखीची चोरी, फसवणूक आणि इतर संभाव्य बेकायदेशीर कृत्ये शोधणे आणि टाळणे; आमच्या सेवांचा गैरवापर टाळण्यासाठी संबंधित किंवा बहुविध खात्यांचा सहसंबंध लावणे; आणि तुम्ही विनंती केलेल्या संयुक्त किंवा को-ब्रँडेड सेवांची सोय करणे, जेथे अशा सेवा एकपेक्षा अधिक कॉर्पोरेट आस्थापनेद्वारा पुरविल्या जात असतात. तुम्ही खास करून पर्याय स्वीकारल्याखेरीज, अशा व्यक्त करण्याच्या परिणामी ती आस्थापने आणि संलग्न कंपन्या कदाचित तुमच्याकडे जाहिरात करणार नाहीत.

  व्यक्तिगत माहिती उघड करणे समन्सच्या प्रतिसादात, न्यायालयाच्या आदेशात किंवा इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी सयुक्तिकरीत्या जरुरी असल्यास, असे करण्यास कायद्याद्वारा गरज पडल्यास किंवा चांगल्या विश्वासात आम्ही व्यक्तिगत माहिती उघड करू शकतो. कायदेशीर अंमलबजावणी एजंट्स, त्रयस्थ पक्ष हक्कांचे मालक, किंवा इतर यांच्यासाठी चांगल्या विश्वासात आम्ही वैयक्तिक माहिती उघड करू शकतो, जेथे असे प्रकटीकरण सयुक्तिकरीत्या यांच्यासाठी आवश्यक असेल: आमच्या वापराच्या किंवा गोपनीयता धोरणाच्या अटी लागू करण्यासाठी; अशा दाव्याला प्रतिसाद जी त्रयस्थ पक्षाच्या हक्कांचे उल्लंघन करणारी एखादी जाहिरात असेल, पोस्टिंग असेल किंवा अन्य आशय असेल; किंवा आमच्या वापरकर्त्यांच्या हक्कांचे, मालमत्तेचे किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेचे किंवा सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे असेल.

  आम्ही आणि आमच्या संलग्न कंपन्या तुमच्या आंशिक किंवा सर्व माहितीला आम्ही (किंवा आमच्या संपत्ती) एक होण्याची योजना करत असलेल्या ते दुसऱ्या व्यवसाय आस्थापन याच्यासह, किंवा अधिग्रहण करण्याचा विचार करत असलेल्या दुसऱ्या व्यवसाय आस्थापन याच्यासह, किंवा व्यवसायाच्या पुनर्गठन, एकत्रीकरण, पुनर्रचना यांच्यासह वापरू शकतो. असा व्यवहार घडण्यासाठी, इतर व्यवसाय आस्थापनाला (किंवा नव्या एकत्रित आस्थापनेला) तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या संदर्भात या गोपनीयता धोरणाचे पालन करण्याची गरज असेल.

  आम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीस तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि तुम्हाला स्वारस्य असू शकणाऱ्या त्रयस्थ पक्ष माल आणि सेवांविषयी तुमच्याशी संपर्क साधण्यास तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर करू शकतो. अशा मार्गे तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर आम्ही करू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया अर्जावर संबंधित चौकात खुण करा, ज्यावर आम्ही तुमचा डेटा घेतो आणि/किंवा तुमच्या खात्याच्या प्रोफाईलमध्ये तुमच्या युजर पसंती अनुकूल करतो.

 2. इतर साईट्सना लिंक्स

  इतर वेबसाईट्सना आमच्या ॲप/वेबसाईट लिंक्स तुमच्याकडून व्यक्तिगतरीत्या ओळखले जाईल अशी माहिती गोळा करू शकतात. तुम्ही अशा वेबसाईट्स ब्राउज करण्याचे निवडल्यास, त्या लिंक्ड वेबसाईट्सच्या गोपनीयता प्रचलनांसाठी किंवा आशयासाठी मायॲग्रीगुरू जबाबदार असणार नाही.

 3. सुरक्षा खबरदाऱ्या

  आमच्या ॲप/वेबसाईटमध्ये आमच्या नियंत्रणाखालील असलेल्या माहितीच्या गहाळ होण्यापासून, गैरवापरापासून आणि बदलापासून संरक्षणासाठी काटेकोर सुरक्षा उपाययोजना आहेत. जेव्हापण तुम्ही तुमच्या खात्याच्या माहितीस बदलता किंवा पाहता, तेव्हा आम्ही सुरक्षा सर्वरच्या वापराचा प्रस्ताव ठेवतो. तुमची माहिती एकदा आमच्या ताब्यात आली, की मग कोणत्याही अनधिकृत एक्सेसच्या विरुद्ध संरक्षण करण्यासाठी आम्ही काटेकोर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतो.

 4. निवड/बाहेर पडणे

  आम्ही सर्व वापरकर्त्यांना एक खाते निर्माण केल्यानंतर, आमच्या भागीदारांच्या वतीने आमच्याकडून, सामान्यपणे आमच्याकडून जरुरी नसलेल्या (प्रचारात्मक, विपणनाशी संबंधित) पत्रव्यवहार मिळण्यापासून थांबविण्याची संधी देऊ करतो.

  तुम्हाला सर्व मायॲग्रीगुरू यादींमधून तुमची संपर्क माहिती हटवायची असेल, तर आम्हाल येथे [email protected] किंवा [email protected] येथे लिहा.

 5. मायॲग्रीगुरू ॲप/वेबसाईटवर जाहिराती

  तुम्ही जेव्हा आमच्या ॲप/वेबसाईटला भेट देता, तेव्हा आम्ही जाहिराती दाखविण्यासाठी त्रयस्थ पक्ष जाहिरात कंपन्या वापरतो. या कंपन्या तुम्हाला स्वारस्य असलेल्या माल आणि सेवांविषयी जाहिराती पुरविण्यासाठी, तुमच्या या आणि इतर वेबसाईट्सना दिलेल्या भेटींविषयी माहिती वापरू शकतात.

 6. तुमची संमती

  ही ॲप/वेबसाईट वापरून आणि/किंवा तुमची माहिती देऊन, तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या अनुषंगाने, या गोपनीयता माहितीच्या अनुसार तुमच्या माहितीस व्यक्त करण्यासाठी, अन्य गोष्टींबरोबरच तुमच्या संमतीसह, जेव्हा या ॲप/वेबसाईटवर तुम्ही उघड करत असलेली किंवा आमची ॲप/वेबसाईट वापरता, तेव्हा निर्माण झालेली माहिती गोळा करण्यासाठी आणि वापरण्यासाठी संमती देत आहात.

  आम्ही जर आमचे गोपनीयता धोरण बदलायचे ठरविले, तर आम्ही हे बदल या पेजवर पोस्ट करू, जेणेकरून आम्ही कोणती माहिती गोळा करतो, ती कशा प्रकारे वापर करतो आणि कोणत्या परिस्थितीखाली उघड करतो, याविषयी तुम्हाला नेहमी जाणीव राहील.

 7. तक्रार अधिकारी

  माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि त्याच्या अंतर्गत बनविलेल्या नियमांच्या अनुषंगाने, तक्रार अधिकाऱ्याचे नाव आणि संपर्क तपशील खालील दिले आहेत:

  [email protected]; महिंद्रा ॲग्री सोल्युशन्स लिमिटेड, 5वा मजला, EPU बिल्डिंग, गेट नं. 4, आकुर्ली रोड, कांदिवली (E), मुंबई 400 101.